आता जिल्ह्यात कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार|One State One Registration|One District One Registration| एक जिल्हा एक नोंदणी
One State One Registration|
एक राज्य एक नोंदणी|
One District One Registration| एक जिल्हा एक नोंदणी |
महाराष्ट्र राज्यात आता One State One Registration या शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन अंतर्गत आता जिल्ह्यात कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात जिल्ह्यातील मिळकतीचा कोणताही दस्त नोंदणी करता येऊ शकतो.
शासनाच्या महत्त्वकांक्षी कार्यक्रमांतर्गत दिनांक 01मे 2025 रोजी पासून जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी ,कोणत्याही तालुक्यात स्थित असलेले कोणतेही मिळकती संबंधित दस्त आता जिल्ह्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शासनाने सर्व निबंधक कार्यालयांचे पदनाम सह दुय्यम निबंधक वर्ग 2 /दुय्यम निबंधक श्रेणी 1 ऐवजी सह दुय्यम निबंधक असे केले आहे या उपक्रमामुळे नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होणार असून त्यांना सोयीस्कर ठिकाणी आता दस्त नोंदणी करता येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा